Home ठळक बातम्या कल्याणात भरलंय एक लाख पुस्तकांच प्रदर्शन; नामवंत प्रकाशक सहभागी

कल्याणात भरलंय एक लाख पुस्तकांच प्रदर्शन; नामवंत प्रकाशक सहभागी

कल्याण दि.20 जानेवारी :
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पुढाकाराने कल्याणात वाचकप्रेमींसाठी भव्य पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. याठिकाणी दर्जेदार आणि नामवंत प्रकाशकांची तब्बल 1 लाखांहून अधिक दर्जेदार पुस्तके मांडण्यात आली आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात भरवण्यात आलेल्या या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या प्रमूख उपस्थितीत करण्यात आले. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित या उपक्रमात प्रदर्शन आणि सवलतीच्या दरांमध्ये विक्रीही केली जाणार आहे. 20 जानेवारीपासून सुरु झालेले हे प्रदर्शन गुरुवारी 21 जानेवारीच्या रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये मॅजेस्टीक प्रकाशन, मेहता प्रकाशन, राजहंस प्रकाशन अशा ख्यातनाम प्रकाशकांची दर्जेदार पुस्तकं सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच कल्याण सार्वजनिक वाचनालय आणि डोंबिवलीमधील गणेश मंदिर वाचनालयातर्फे दुर्मिळ पुस्तकेही वाचकांच्या अवलोकनासाठी या प्रदर्शनात ठेवण्यात आली असून त्याचा वाचकप्रेमींनी लाभ घेण्याचे आवाहन पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा