Home ठळक बातम्या दिमाखात साजरा झाला पोटे ट्युटोरियलचा ‘जल्लोष’

दिमाखात साजरा झाला पोटे ट्युटोरियलचा ‘जल्लोष’

कल्याण दि.6 जानेवारी :
कल्याण डोंबिवलीच्या शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य नाव असणाऱ्या पोटे ट्युटोरियलचा ‘जल्लोष’ कार्यक्रम अत्यंत दिमाखात आणि दणक्यात साजरा करण्यात आला. कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. कल्याण डोंबिवली महापालिकेचे नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे हे प्रमूख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते.

पोटे ट्युटोरियलच्या कल्याण पश्चिम आणि कल्याण पूर्वेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेले धमाकेदार परफॉर्मन्स, पोटे ट्युटोरियलची माजी विद्यार्थिनी श्रद्धा माळीने सादर केलेली ठसकेबाज लावणी, सुप्रसिद्ध डान्सर अमरदिपचा रोबोटिक डान्स, सलमान खानच्या सुपरहिट गाण्यांचा जलवा आणि रुहमंत्रा या म्युजिक बँडने सादर केलेली अफलातून जुगलबंदी ही आजच्या ‘जल्लोष’ची वैशिष्ट्य ठरली.

तसेच दररोज बदलणाऱ्या शिक्षण क्षेत्रात काम करणे आज तितकेसे सोपे राहिलेले नाही. मात्र अशा परिस्थितीमध्ये पोटे ट्युटोरियल शिक्षण क्षेत्रामध्ये महत्वाचे योगदान देत असल्याचे गौरवोद्गार स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांनी यावेळी काढले. तसेच बदल घडवण्यासाठी राजकारणामध्ये अधिकाधिक सुशिक्षित उमेदवारांना निवडून देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

तर आयुष्यात 1 दिवस अभ्यासासाठी, 1 दिवस आई वडिलांसाठी आणि मग उरलेला 1 दिवस जल्लोष करण्यासाठी असतो. आपल्या हातामध्ये मोबाईल आल्यापासून दररोज जल्लोष साजरा करावासा वाटतोय. मात्र रोज नव्हे तर आपल्या ध्येयप्राप्तीनंतर, आपण ठरवलेले उद्दीष्ट गाठल्यानंतरच हा जल्लोष झाला पाहीजे असे मत पोटे ग्रुपचे सीएमडी बिपीन पोटे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

दरम्यान विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला पोटे ग्रुपचे चेअरमन सचिन पोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोटे ट्युटोरियल्सचे नामदेव सर, माळी सर, भानुशाली सर, शिरसाट सर, निधी मॅडम आणि पोटे ट्युटोरियल्सच्या सर्व टीमने विशेष मेहनत घेतली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*