Home Uncategorised कोजागिरीनिमित्त कल्याणच्या ऐतिहासिक दुधनाक्यावर दुधविक्री जोरात

कोजागिरीनिमित्त कल्याणच्या ऐतिहासिक दुधनाक्यावर दुधविक्री जोरात

कल्याण दि.23 ऑक्टोबर :
आज असणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कल्याणच्या ऐतिहासिक दुधनाक्यावर दुधाची विक्री जोरात असलेली पाहायला मिळत आहे. त्यामूळे एरव्हीच्या तुलनेत आज दुधाला मागणीही चांगली असल्याचे दूध व्यावसायिकांनी सांगितले.

कल्याणच्या दुधनाक्याला ऐतिहासिक महत्त्व असून तब्बल ६०० वर्षांपासून इथे दुधाची विक्री केली जाते. कल्याणच्या दुधनाका, पारनाका, गोविंदवाडी, दुर्गाडी परिसरात अनेक मोठमोठे तबेले आहेत. तिथल्या दुधाची पिढ्यानपिढ्या दुधनाक्यावर विक्री होत आहे. आज कोजागिरी पौर्णिमेनिमित्त पहाटेपासून दुधनाक्यावर दुधाची विक्री सुरू झाली. यानंतर अवघ्या काही तासात इथे १५ हजारावर लिटर दुधाची खरेदी-विक्री झाली. ईद, कोजागिरी आणि अन्य सणासुदीलाही इथल्या दुधाची मागणी वाढत असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*