केडीएमसी सचिवांकडून विशेष सभेची सूचना झाली प्रसिद्ध
कल्याण डोंबिवली दि.26 जानेवारी :
कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थापन झाल्यानंतरची (1982 ते 1995 = 13 वर्षे) नंतरची सर्वाधिक काळ राहिलेली प्रशासकीय राजवट संपण्यासाठी आता अवघा एक आठवडा उरला आहे. येत्या 3 फेब्रुवारी रोजी कल्याण डोंबिवलीला नविन महापौर, उपमहापौर मिळणार आहेत. केडीएमसी सचिव किशोर शेळके यांच्याकडून याबाबतची विशेष सर्वसाधारण सभेची सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. परंतु महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच संपन्न झाल्या आहेत. तर गेल्याच आठवड्यात महापौर पदाच्या आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी हे पद निश्चित झाले आहे. मात्र इथल्या नाट्यमय राजकीय घडामोडी आणि शह – काटशहाच्या राजकारणामुळे महापौरपदी कोण बसणार हा सस्पेन्स कायम आहे. कारण आरक्षण जाहीर झालेल्या प्रवर्गाचे शिवसेनेकडे ॲड. हर्षाली थविल – चौधरी आणि किरण भांगले हे दोन निवडून आलेले नगरसेवक आहेत. यापैकी आता पक्षश्रेष्ठी कोणाच्या नावाला पसंती देतात हे 3 तारखेपर्यंत स्पष्ट होईल.
महापौर पदाचा असा जाहीर झालाय कार्यक्रम…
1) गुरुवारी 29 जानेवारी ते शुक्रवारी 30 जानेवारीपर्यंत सचिव कार्यालयात नामनिर्देश पत्र दाखल करणे…
2) मंगळवारी 3 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून महापौर – उपमहापौर निवडीची विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन…

