Site icon LNN

डोंबिवलीतील 3 प्रीमॅच्युअर्ड नवजात बाळांच्या वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन

डोंबिवली | ११ ऑगस्ट :
डोंबिवलीतील सुरज साळुंखे यांच्या कुटुंबात 28 जुलै 2026 रोजी एकाच वेळी तीन चिमुकल्या जीवांचे आगमन झाले आहे. मात्र ही तिन्ही बाळं प्री मॅच्युअर्ड (Premature) जन्माला आली असून, त्यांचे वजन अवघे ७०० ते ८०० ग्रॅम आहे. जन्मापासूनच त्यांना जीवरक्षक वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असून सध्या डोंबिवलीतील ‘मदरनेस्ट हॉस्पिटल’च्या NICU मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (

या तिन्ही नवजात बाळांवर पुढील ९० दिवस वैद्यकीय उपचार करणे अत्यावश्यक असून त्यासाठी अंदाजे ₹६६ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे. या कुटुंबासाठी एवढी मोठी रक्कम उभी करणे अत्यंत कठीण असल्याने समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था आणि संवेदनशील नागरिकांनी शक्य ती आर्थिक मदत करण्याचे आवाहन कुटुंबियांकडून करण्यात येत आहे.

*अधिक माहितीसाठी / मदतीसाठी कुटुंबियांचे संपर्क :*
सूरज साळुंखे 9029149629
गणेश मोरे – 9967670357

Exit mobile version