Home ठळक बातम्या डोंबिवली एमआयडीसीमध्ये फार्मासिटीकल रिसर्च सेंटरला आग

डोंबिवली एमआयडीसीमध्ये फार्मासिटीकल रिसर्च सेंटरला आग

डोंबिवली दि.27 जानेवारी :  
डोंबिवली एमआयडीसीमध्ये पुन्हा एकदा आग लागण्याची घटना घडली असून इथल्या फार्मासिटीकल रिसर्च सेंटरला आग लागल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे डोंबिवली एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली असून गॅलेक्सी फार्मसिटीकल रिसर्च सेंटर असे आग लागलेल्या कंपनीचे नाव आहे. या रिसर्च सेंटरमध्ये नवीन प्रोडक्ट तयार करण्याचे काम केले जाते. हे काम सुरू असताना अचानक आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान आगीची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेमुळे पुन्हा एकदा डोंबिवली एमआयडीसी परिसरातील औद्योगिक सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा