Home ठळक बातम्या डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग; सुदैवाने कोणालाही दुखापत नाही

डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग; सुदैवाने कोणालाही दुखापत नाही

 

डोंबिवली दि.24 फेब्रुवारी :

डोंबिवली एमआयडीसी परिसरात असणाऱ्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. सोनारपाडा येथे लेदरचे पट्टे आणि बॅग बनवणरी ही कंपनी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

आज संध्याकाळच्या सुमारास ही आग लागली असून आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. तर आग लागल्याची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तब्बल एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. तर सध्या अग्निशमन दलाकडून याठिकाणी आता कुलिंगचे काम सुरू आहे.

दरम्यान या आगीत कंपनीमधील संपूर्ण माल जळून खाक झाल्याची माहिती आहे. तर आज शुक्रवार असल्याने ही कंपनी बंद होती. त्यामुळे सुदैवानं कंपनीत कामगार नसल्याने जीवितहानी झाली नाही. तर ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा