Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 5 माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 5 माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार – कुणाल पाटील

मुंबई दि.21 एप्रिल :
कल्याण डोंबिवली महानगपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे अद्याप तळ्यात मळ्यात सुरू असले तरी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याचा माजी नगरसेवकांचा सिलसिला मात्र कायम आहे. एकीकडे शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू असताना केडीएमसीच्या 5 माजी नगरसेवक आणि नगरसेविकांनी आज आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ()5 former corporators of Kalyan Dombivali Municipal Corporation join NCP)

कल्याण डोंबिवली महानगपालिकेचे माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील, भाजप नगरसेविका सुनीता खंडागळे, एमआयएमच्या माजी नगरसेविका तांजिला मौलवी, शिवसेनेच्या उर्मिला गोसावी यांच्यासह फैजल जलाल यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

यावेळी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, कार्याध्यक्ष वंडार पाटील, निरीक्षक प्रमोद हिंदुराव, प्रवक्ते महेश तपासे, माजी खा.आनंद परांजपे, उपस्थित होते.

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार – कुणाल पाटील

लहानपणापासुनच आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा आवडत आली आहे. त्यामुळे आपण या पक्षात प्रवेश करणे स्वाभाविकच होते. कल्याण डोंबिवलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न आपण करणार असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी सांगितले. तसेच आगामी केडीएमसी निवडणुकीत राष्ट्रवादीच्या जागा कशा वाढतील आणि महविकास आघाडीची सत्ता येण्यासाठी आपण करणार असल्याचेही त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा