Home बातम्या केडीएमसीच्या माजी नगरसेवकाचा घनकचरा करवसुलीला विरोध

केडीएमसीच्या माजी नगरसेवकाचा घनकचरा करवसुलीला विरोध

 

डोंबिवली दि.1 जुलै :

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने घनकचरा कर वसुली सुरु करून कोरोनाकाळात आर्थिकदृष्ट्या बेजार नागरिकांच्या त्रासात आणखी भर पाडली आहे. त्यामुळे या करवसुलीला शिवसेनेचे माजी नगरसेवक वामन म्हात्रे यांनी विरोध तीव्र विरोध दर्शविला आहे.

घनकचरा व्यवस्थापन करापोटी प्रत्येक मालमत्ताधारकाकडून वर्षाला 600 रुपये इतकी रक्कम आकारण्यास सुरुवात केली आहे. आधीच कोरोनामूळे नागरिकांची आर्थिक गणितं बिघडली असून अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत तर काहींच्या पगारात कपात झाली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने 2011 ते 2020 या कालावधीत विकासकामांवर 26 हजार कोटींचा भांडवली खर्च केला असूनही ही विकासकामे अपूर्ण आहेत. मोकळ्या जागेवरील करात बिल्डरांना सूट देताना सामान्य नागरिकांनाही मालमत्ताकरात सूट देण्याचे आश्वासन दिले होते. बिल्डरांना सूट देऊनही थकीत रकमेचा कोट्यवधींचा भरणा करत नसल्याने पालिकेने दोनदा अभय योजनाही मात्र सामान्य इकडे करदात्यांचा विचार केला जात नसल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे.
घनकचरा कराऐवजी बेकायदा नळजोडण्या नियमित केल्यास त्यातून पालिकेला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळू शकेल. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत पालिका नागरिकांच्या माथी कचरा कर लादत असल्याला वामन म्हात्रे यांनी विरोध दर्शवला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा