Home ठळक बातम्या गरजू महिलांना दर महिन्याला मोफत सॅनिटरी पॅड ; माजी नगरसेवकाचा उपक्रम

गरजू महिलांना दर महिन्याला मोफत सॅनिटरी पॅड ; माजी नगरसेवकाचा उपक्रम

कल्याण दि.9 मार्च :
कल्याणात एका माजी नगरसेवकाने राबवलेला आगळा वेगळा सामाजिक उपक्रम सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. जागतिक महिला दिनानिमित्त गरजू महिलांना दर महिन्याला मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून दिले जाणार (Free sanitary pad distribution to needy women every month; An initiative of a former corporator) असून एखाद्या लोकप्रतिनिधीकडून राबवण्यात आलेला अशाप्रकारचा हा पहिलाच उपक्रम असावा.

एरव्ही महिला दिन म्हटलं की रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर किंवा कर्तृत्ववान महिलांचा गौरव असेच काहीसे साचेबद्ध कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतात. परंतू कल्याणातील संदीप गायकर यांनी मात्र या पारंपरिक कार्यक्रमांना छेद देत काळाची आणि विशेषतः महिला वर्गाची गरज ओळखत ‘सॅनिटरी पॅड’चा हा अनोखा उपक्रम राबवला आहे. तर कोणत्याही सेलिब्रिटी किंवा इतर नामांकित व्यक्तींना न बोलवता आई शांता आणि पत्नी योजना गायकर यांच्या हस्ते या सामाजिक उपक्रमाचा संदीप गायकर यांनी शुभारंभ केलेला पाहायला मिळाला. तर येत्या काळात प्रभागात ठिकठिकाणी सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीनही बसवण्यात येणार आहेत.

आपल्या समाजात अशा असंख्य महिला आहेत, ज्यांची दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. अशा परिस्थितीत स्वतःसाठी किंवा आपल्या मुलींसाठी ‘सॅनिटरी पॅड’चा दर महिन्याचा खर्च त्यांना अजिबात परवडणारा नाही. म्हणून आपण हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संदीप गायकर यांनी दिली.

नेहमीच काही तरी वेगळ्या वाटेने जाऊन सामाजिक काम करणारा लोकप्रतिनिधी म्हणून संदीप गायकर यांची ओळख आहे. महिला दिनानिमित्त राबवलेल्या या उपक्रमाने त्यांची ही ओळख आणखी ठळक झाली असून या सामाजिक उपक्रमाचे महिला वर्गानेही जोरदार स्वागत केल्याचे दिसून आले.

१ कॉमेंट

Leave a Reply to GOPAL PILLAI प्रतिक्रिया रद्द करा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा