Home ठळक बातम्या सह्याद्री पर्वत रांगांतील अत्यंत कठीण भैरवगड कल्याणातील 4 वर्षांच्या चिमुकल्याकडून सर

सह्याद्री पर्वत रांगांतील अत्यंत कठीण भैरवगड कल्याणातील 4 वर्षांच्या चिमुकल्याकडून सर

 

कल्याण दि.8 फेब्रुवारी:
सह्याद्रीच्या खोऱ्यातील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या किल्ल्यांपैकी एक असा भैरवगड. कल्याणातील अवघ्या 4 वर्षांच्या चिमुकल्याने हाच भैरवगड सर करत भीम पराक्रम केला. सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर्सच्या साथीने या 4 वर्षांच्या चिमुकल्याने या किल्ल्यावर यशस्वी चढाई केली. (From the 4 year old little boy of Kalyan climbed the extremely difficult Sahyadri mountain ranges)

ओम महादेव ढाकणे असे या 4 वर्षांच्या चिमुकल्याचे नाव आहे. कित्येक किलोमीटरवर पसरलेल्या सह्याद्री पर्वतरांगांमधील ट्रेकर्सच्या दृष्टीने सर्वात कठीण असा माळशेज घाटातील मोरोशीचा भैरवगड. मात्र चिमुकल्या ओमकारने सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर्सच्या सदस्यांच्या सोबतीने कठीण असा हा भैरवगड अत्यंत लिलया सर केला. महाराष्ट्रातील सर्वात लहान गिर्यारोहकांपैकी एक अशी ख्याती असणाऱ्या ओंकारने याआधी कल्याणजवळील श्रीमलंगगडही सहजपणे सर केला आहे. तर माळशेज घाटातील मोरोशीचा भैरवगड किल्ला सर करणारा ओंकार सर्वात लहान गिर्यारोहक ठरला आहे.

कल्याणमधील “सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर” हा ग्रुप सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात नित्यनेमाने धाडसी मोहिमा आखत असतो. अशीच एक भैरवगडाची मोहीम राबवत त्यासाठी सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरने  रात्री १ वाजता मोरोशी गावातून चढाईला सुरुवात केली.  जंगलातील वाट तुडवत तुडवत मोरोशीच्या भैरवगडाच्या माचीवर पोहचण्यास पहाटे ३ वाजले. त्यानंतर माचीवर काही काळ आराम करून कड्याच्या पायथ्याशी पोहचण्यासाठी पुन्हा एक तासाची चढाई केली. तर सकाळी ओंकारने पवन घुगे, दर्शन देशमुख, रणजित भोसले, भूषण पवार, अक्षय जमदरे, राजेश गायकर, प्रशिल अंबाडे, लतीकेश कदम आणि विकी बोरकुले आदी सहकाऱ्यांच्या मदतीने भैरवगड सर केला आणि कल्याणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा