Home ठळक बातम्या आजपासून कल्याण स्टेशनऐवजी केडीएमटी, एनएमएमटी बसेस या नविन ठिकाणावरून सुटण्यास सुरुवात

आजपासून कल्याण स्टेशनऐवजी केडीएमटी, एनएमएमटी बसेस या नविन ठिकाणावरून सुटण्यास सुरुवात

मात्र अद्याप एसटीकडून निर्णयाची अंमलबजावणी नाही

कल्याण दि.5 डिसेंबर :
कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत सुरू असणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामामुळे कल्याण स्टेशन परिसरातील बाहेरगावच्या एसटी, एनएनएमटी, केडीएमटी बसेस दुर्गाडी चौक आणि मुरबाड रोड गणेश घाट परिसरातून सोडण्याचा केडीएमसी प्रशासनाने निर्णय घेतला आहे. या निर्णयाची आजपासून (5 डिसेंबर) अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र एनएमएमटी आणि के डी एम टी वगळता एस टी प्रशासनाकडून मात्र या निर्णयाची अंमबजावणी होत नसल्याचे दिसत आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याण स्टेशन परिसरात उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाला वाहतूक कोंडीमुळे अडथळे येत आहेत. त्यामुळे बाहेरगावहून येणाऱ्या एसटी बसेस आता कल्याण स्टेशनला जाणार नाहीत. त्याऐवजी या बसेस मुरबाड रोड गणेश घाट आणि गुरुदेव हॉटेल परिसरामध्ये प्रवासी सोडण्याचे आणि घेण्याचे काम करतील.

तर कल्याण एसटी डेपोमधून बाहेरगावी जाणाऱ्या एसटी बसेस या आता मुरबाड रोड गणेश घाट येथून सोडण्याचा येतील. यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा दुर्गाडी आणि गणेश घाट परिसरात उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

केडीएमटी एनएमएमटीच्या बसेसही दुर्गाडीहून…
केडीएमटीच्या पनवेल, वाशी जाणाऱ्या आणि एनएमएमटीच्या कल्याण स्टेशन परिसरात येणाऱ्या सर्व बसेसही आता दुर्गाडीहून सोडल्या जात आहेत. तर कल्याण स्टेशनवरून दुर्गाडी चौकात किंवा गणेश घाट परिसरात जाण्यासाठी मिनी बसची व्यवस्था करण्यात आली आहे.

मार्च महिन्यापर्यंत बदल लागू …
कल्याण स्टेशनऐवजी दुर्गाडी चौक आणि गणेश घाट परिसरातून सुटणाऱ्या या बाहेरगावच्या बसेस पुढील वर्षीच्या मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत या नव्या ठिकाणाहून सोडण्यात येणार आहेत. डिसेंबर ते मार्च या चार महिन्यांपर्यंत हे बदल लागू राहणार असून तोपर्यंत स्टेशन परिसरातील उड्डाणपुलाचे काम बऱ्यापैकी झाले असेल. ज्यामुळे त्याच्या खालून पुन्हा एकदा पूर्वीसारखी वाहतूक सुरू करता येईल असे केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी स्पष्ट केले.

बससोबतच स्टेशन परिसरातील रिक्षा चालकांबाबत महत्वाचा निर्णय…
कल्याण स्टेशन परिसरात नागरीकांनंतर रिक्षा चालकांची सर्वात मोठी गर्दी असते. रिक्षांच्या चार चार लाईनमुळेही स्टेशन परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे कल्याण स्टेशन परिसरात आता रिक्षांच्या केवळ दोन लाईन्स असतील. पहिली रांग ही मीटरवर जाणाऱ्या रिक्षांची तर दुसरी ही शेअरवर जाणाऱ्या रिक्षांची रांग असेल असे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले होते. परंतू या निर्णयाचीही स्टेशन परीसरात कोणतीही अंमलबजावणी होत नसल्यानेच दिसून आले.

१ कॉमेंट

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा