Home ठळक बातम्या जायंटस् ग्रुपतर्फे कर्तुत्ववान महिलांचा मणीकर्णिका पुरस्काराने सन्मान

जायंटस् ग्रुपतर्फे कर्तुत्ववान महिलांचा मणीकर्णिका पुरस्काराने सन्मान

के.सी.गांधी ऑडीटोरियममध्ये झाला नेत्रदीपक सोहळा

कल्याण दि.२६ फेब्रुवारी :
आगामी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या कर्तुत्ववान महिलांचा कल्याणात विशेष सन्मान करण्यात आला. जायंटस् वेलफेअर फाउंडेशनच्या फेडरेशन १सी च्या माध्यमातून जायंटस् ग्रुपच्या विविध शाखांच्या नविन पदाधिकारी – सदस्यांचा शपथग्रहण आणि कर्तृत्ववान महिलांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

जायंटस् वेलफेअर फेडरेशन यंदा आपला सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. त्या पार्श्वभूमीवर काल झालेल्या या सोहळ्यामध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून काल आर्किटेक्ट शैलेजा वैद्य, ॲड. तृप्ती पाटील, भारती चौधरी आणि छाया घाटगे, डॉ. ईशा पानसरे या महिलांना मणीकर्णिका पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

तर मणीकर्णिका पुरस्कारांसोबत जायंटस् वेलफेअर फाऊंडेशनच्या फेडरेशन १सीमधील नविन पदाधिकारी सदस्यांचा यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत शपथग्रहण कार्यक्रमही पार पडला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जायंटस् वर्ल्ड फाऊंडेशनचे सत्यप्रकाश चतुर्वेदी, विशेष कमिटी सदस्य मनोहर पालन, गगन जैन, अशोक मेहता, फेडरेशन १सीचे अध्यक्ष आशिष खंडेलवाल, प्रा. किशोर देसाई, एनसीएफ सुनिल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच जायंटस् ग्रुप कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी आणि तळेगाव दाभाडे येथील पदाधिकारी आणि सदस्यही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तर यावेळी जायंटस् सदस्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिल्याचे दिसून आले

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा