Home ठळक बातम्या कल्याण -शिळ रोडवरील नव्या पुलाच्या गर्डर लाँचिंगचे काम सुरू ; 20 ऑक्टोबरपर्यंत...

कल्याण -शिळ रोडवरील नव्या पुलाच्या गर्डर लाँचिंगचे काम सुरू ; 20 ऑक्टोबरपर्यंत चालणार काम

 

काटई ते पलावा जंक्शन दरम्यान बनतोय नवा उड्डाणपूल

डोंबिवली दि.17 ऑक्टोबर :
कल्याण -शिळ मार्गावर पलावा जंक्शन परिसरात होणारी वाहतूक कोंडी कमी फोडण्यात महत्वाची भूमिका असणाऱ्या नव्या उड्डाणपुलाच्या गर्डर लाँचिंगच्या कामाला शनिवारी रात्रीपासून सुरुवात झाली. पुढील 4 दिवस म्हणजे येत्या 20 ऑक्टोबरपर्यंत या नव्या पुलाचे गर्डर बसवण्याचे काम केले जाणार आहे. काल रात्री खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमूख उपस्थितीत या कामाला सुरुवात करण्यात आली. तर यावेळी अचानकपणे मनसेचे स्थानिक आमदार राजू पाटील यांची एंट्री झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

कल्याण – शिळ रस्त्याचर सहा पदरीकरणाचे काम सध्या सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून पलावा जंक्शन ते काटई दरम्यान नविन उड्डाणपूल उभारला जात आहे. सध्या काटई ते पलावा जंक्शन या अवघ्या काही मिनिटांच्या प्रवासाला वाहतूक कोंडीमूळे मोठा वेळ लागत आहे. मात्र या नव्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यावर नागरिकांना वाहतूक कोंडीतून नक्कीच दिलासा मिळेल असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
16 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर असे चार दिवस रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत हे गर्डर लाँचिंगचे काम चालणार आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच झालेल्या पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात खासदार डॉ. शिंदे यांनी विरोधकांवर शेलक्या शब्दांत टिका केली होती. त्या पार्श्वभूमीवर काल रात्री मनसेचे स्थानिक आमदार राजू पाटील हे देखील गर्डर लाँचिंगच्या ठिकाणी उपस्थित असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

तर या पुलाच्या कामामुळे या मार्गावर रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत अवजड वाहनांना नो एंट्री करण्यात आली आहे.

*प्रवेश बंद – कल्याण फाटा कडून कल्याण कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड़ अवजड वाहनांना कल्याण फाटा येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग –
१) कल्याण फाटा कडून कल्याण कडे जाणारी सर्व प्रकारच्या जड अवजड वाहने ही कल्याण फाटा-मुंब्रा बायपास मार्गे- खारेगाव टोलनाका मार्गे इच्छित स्थळी जातील.

*प्रवेश बंद- कल्याण कडून कल्याण फाटा कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनाना बदलापूर चौक येथे “प्रवेश बंद”
पर्यायी मार्ग :
२) कल्याण कडून कल्याण फाटा कडे जाणारी सर्व प्रकारच्या जड अवजड वाहने ही बदलापूर चौक-खोणी नाका-तळोजा एमआयडीसी मार्गे इच्छित स्थळी जातील.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा