Home ठळक बातम्या डोंबिवलीच्या कोपर पुलाचे गर्डर दखल; गर्डर बसवण्याच्या कामासाठी वाहतुकीत बदल

डोंबिवलीच्या कोपर पुलाचे गर्डर दखल; गर्डर बसवण्याच्या कामासाठी वाहतुकीत बदल

 

डोंबिवली दि.22 मार्च :
डोंबिवली शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या आणि डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर पुलाचे गर्डर आज सकाळी डोंबिवलीत दाखल झाले. या गर्डर बसवण्याच्या कामासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला होता. (girder-of-the-kopar-bridge-arrived-in-dombivli-changes-in-transportation-for-girder-installation-work)

वाहतुकीसाठी धोकादायक ठरल्याने गेल्यावर्षी हा कोपर पूल बंद करण्यात आला. डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला येण्या-जाण्यासाठी हा पूल महत्वाचा आहे. त्याचे काम सध्या सुरू असून कामाच्या गतीवरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या पार्श्वभूमीवर आज सकाळी दाखल झालेल्या या पुलाच्या गर्डरचे डोंबिवलीकरांकडून श्रीफळ वाढवून स्वागत करण्यात आले. यावेळी केडीएमसीचे माजी स्थायी सभापती दिपेश म्हात्रे, राजेश कदम वाहतुक शाखेच्या अधिकारी राजश्री शिंदे ‌‌‌‌उपस्थित होते. बहुचर्चित पत्रीपुलानंतर आता डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणारा कोपर पुलाचे गर्डर लॉंचिंग आज करण्यात आले. या पुलाचे एकूण 7 गर्डर औरंगाबादहुन आज सकाळी डोंबिवलीमध्ये दाखल झाले असून पुढील काही दिवसांत दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित 14 गर्डर येणार आहेत.

दरम्यान या गर्डर बसवण्याच्या कामासाठी डोंबिवली पूर्वेतील आयरे रोड, आयरे गाव, रामनगर ते राजाजी पथ या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे गर्डर बसवण्याचे काम चालणार असून तोपर्यंत हा बदल लागू असणार असल्याची माहिती डोंबिवली वाहतूक विभागातर्फे देण्यात आली आहे.

फोटो-माहिती सौजन्य :- विश्वनाथ शेनॉय, एलएनएन सिटीजन रिपोर्टर

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा