Home ठळक बातम्या महाराष्ट्र राज्य क्लासिक पॉवरलिफ्टींग स्पर्धेत कल्याणच्या २ खेळाडूंना सुवर्ण पदक

महाराष्ट्र राज्य क्लासिक पॉवरलिफ्टींग स्पर्धेत कल्याणच्या २ खेळाडूंना सुवर्ण पदक

 

कल्याण दि.३ एप्रिल :
मुंबईमध्ये नुकत्याच झालेल्या सीनियर महाराष्ट्र राज्य क्लासिक पॉवरलिफ्टींग स्पर्धेत कल्याणच्या कारभारी जिमच्या दोघा खेळाडूंनी सुवर्ण पदक पटकावले. सुश्मिता सुनील देशमुखने 52 किलो वजनी गटात आणि निलेश नामदेव भोईर याने 66 किलो वजनी गटात हे सुवर्णपदक पटकावले. तर विनायक जयराम कारभारी यांनी 83 किलो वजनी गटात रजत पदक पटकाविले.

या महिन्यात केरळ येथे १० ते १३ एप्रिल रोजी होणाऱ्या सीनियर नॅशनल क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठीही या तिघा खेळाडूंची निवड झाली आहे. सुश्मिता सुनील देशमुख आणि निलेश भोईर हे दोघंही कल्याणच्या कारभारी जिम्नॅशियममध्ये प्रशिक्षक विनायक जयराम कारभारी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

मागील लेखछत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले म्हणजे ऊर्जाकेंद्र- शक्तीपीठं – डॉ. विजय सुर्यवंशी
पुढील लेखकेंद्र सरकारविरोधात डोंबिवलीत युवासेनेचे थाळीनाद आंदोलन

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा