Home ठळक बातम्या गूडन्यूज: २७ गावांना मिळणार मुबलक पाणी – उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आदेश

गूडन्यूज: २७ गावांना मिळणार मुबलक पाणी – उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आदेश

    खासदार डॉश्रीकांत शिंदे यांच्या मागणीला यशउद्योगांना प्रक्रिया केलेले पाणी देण्याच्या हालचाली

मुंबई दि. ३० सप्टेंबर :  कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांना कमी दाबाने आणि अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉश्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने आज राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होतेया बैठकीत २७ गावांना उच्च दाबाने आणि मुबलक पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आलाएमआयडीसीकडून शहराला १०५ दशलक्ष लीटर पाणी देणे अपेक्षितअसताना फक्त ६० दशलक्ष लीटर पाणी मिळत असल्याची बाब यावेळी उद्योग मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.त्यावर बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कल्याण डोंबिवलीला ९० दशलक्ष लीटर पाणी देणारच असे स्पष्ट केलेयावेळी शहरातील इतर पाणी समस्यांवरही दिलासादायक निर्णय घेण्यात आले.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी खासदार डॉश्रीकांत शिंदे कायम सक्रीय असतातत्यांच्या माध्यमातून शहरातील पाणी पुरवठा योजना मार्गी लागते आहेकल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांमध्ये कमी दाबाने आणि कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी गेल्या अनेक महिन्यांपासून केल्या जात होत्यात्यामुळे यावर तोडगा काढण्याची मागणी स्थानिकांकडून कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉश्रीकांत शिंदे यांच्याकडे सातत्याने केली जात होती.

९० दशलक्ष लीटर पाणी उच्च दाबाने देण्याचे आदेश…

यासह शहरातील पाण्याच्या अनेक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी खासदार डॉशिंदे यांच्या पुढाकाराने आज (शुक्रवारी ) मंत्रालयात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होतेत्यावेळी लोकप्रतिनिधींनी शहरातील पाण्याच्या समस्या मांडल्याकल्याण डोंबिवली पालिकेसाठी १०५ दशलक्ष लीटर पाणी मंजूर आहेमात्र अवघा ६० दशलक्ष लीटर पाणी प्रत्यक्षात मिळतेत्यामुळे किमान ९० दशलक्ष लीटर पाणी मिळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली होतीत्यावर बोलताना मंत्री उदय सामंत यांनी तात्काळनिर्णय देतकिमान ९० दशलक्ष लीटर पाणी तेही उच्च दाबाने देण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिलेतसेच एमआयडीसीकडून किती पाणी पुरवण्यात येतेत्याचा दाब किती असतोयाची माहिती मिळण्यासाठी येथे मीटर बसवण्याचे आदेशही मंत्र्यांनी दिलेअमृत योजनेत पाणी पुरवठा करण्यासाठी हेदुटने आणि कोळे येथे दोन नव्या जोडण्या देण्याची मागणी होती.त्यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी निर्णय देत या जोडण्यांना परवानगी देण्याचे  आदेश दिले.

पिण्याचे पाणी देण्यास प्राथमिकता द्यायला हवी…

एमआयडीसी प्रशासनाकडून उद्योगांना पाणी देण्यात येतेमात्र रहिवाशांना पिण्याचे पाणी देण्यास प्राथमिकता द्यायला हवीअसे सांगत खासदार डॉश्रीकांत शिंदे यांनी उद्योगांना सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून सेकंडरी प्रक्रिया केले जाणारे पाणी देण्याचा प्रस्ताव ठेवलाकल्याण पूर्वेतील पालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून हे पाणी देण्यासाठी आणि जलवाहिन्या टाकण्यासाठी त्याचा सविस्तर अभ्यास आणि अहवाल तयार करण्याचे आदेश यावेळी उदय सामंत यांनी दिलेत्यामुळे रहिवाशांना पाणी देणे सोपे होणार आहेतसेच एमआयडीसीने प्रक्रिया केलेले किमान ४० दशलक्ष लीटर पाणी रहिवाशांना देता येईल.

एमआयडीसी कार्यालयातच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला जागा…

शहराजवळ उदभवणाऱ्या प्रदूषणाच्या सातत्याने समोर येत असल्याने एमआयडीसीच्या कार्यालयातच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला जागा द्यावी, असे आवाहन यावेळी केले. त्यावर सामंत यांनी तात्काळ अशा जागा देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

देशमुख होम्स’ गृहप्रकल्पाला पुरेसे पाणी

डोंबिवलीच्या ‘देशमुख होम्स’ या गृह प्रकल्पाच्या पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी औद्योगिक विभागाला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात वापरले जाणारे बूस्टर दोन तास बंद करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यामुळे या गृहप्रकल्पाला पुरेसे पाणी मिळणार आहे.

यावेळी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख, एमआयडीसी मलीकनेर, सुधीर नागे, डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, उपतालुका प्रमुख बंडू पाटील,  दीपेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, उल्हासनगरचे नगरसेवक अरुण आशान, रवी म्हात्रे, पंढरीनाथ पाटील, अनिल म्हात्रे विकास देसले,आनंद देसले आणि शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा