Home ठळक बातम्या गुडन्यूज : डोंबिवलीतील ‘पासपोर्ट सेवा केंद्र’ पुढच्या महिन्यात होणार सुरू

गुडन्यूज : डोंबिवलीतील ‘पासपोर्ट सेवा केंद्र’ पुढच्या महिन्यात होणार सुरू

परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि टपाल खात्याचा हिरवा कंदील

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

डोंबिवली 20 सप्टेंबर :
कल्याण डोंबिवली परिसरासह आजूबाजूच्या शहरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. डोंबिवली पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून येत्या ऑक्टोबर महिन्यात हे केंद्र कार्यान्वित होणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. डोंबिवलीतील हे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याबाबत केंद्र सरकारच्या संचारराज्य मंत्रालयाकडून सूचित करण्यात आल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून २०१७ पासून हे पासपोर्ट सेवा केंद्र डोंबिवलीत सुरू व्हावे यासाठी सततचा पाठपुरावा सुरू होता. त्यामुळेच डोंबिवलीत एमआयडीसी येथे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यास मंजुरी मिळाली. मात्र दिड वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे हे केंद्र सुरु करण्यास काहीसा विलंब झाला.

दरम्यान यासंदर्भात खा. शिंदे यांनी लोकसभा अधिवेशनदरम्यान केंद्रीय संचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांची भेट घेत संपूर्ण शासकीय प्रक्रीया पार पडलेले पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यावर

केंद्र सरकारच्या गेल्या कालखंडात दिवंगत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या कार्यकाळात देशभरात पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिवंगत परराष्ट्रमंत्री मंत्री स्वराज यांचेकडे सातत्याने पाठपुरावा करून कल्याण लोकसभा मतदारसंघात डोंबिवली एमआयडीसी येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यास मंजुरी मिळवली.

ठण्यामधील पासपोर्ट सेवा केंद्र हे संपूर्ण एमएमआर प्रदेशातील एकमेव सेवा केंद्र असल्यामुळे या सेवा केंद्रावर मोठा ताण पडत होता. तसेच नागरिकांनाही लांब अंतरावरून यावे लागत असल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. मात्र आता डोंबिवली एमआयडीसीच्या पोस्ट ऑफिसमध्ये हे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाल्यास ठाणे जिल्ह्यातील उपनगर शहरांना खासकरून कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर यांच्यासह आसपासच्या परिसरालाही त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.

१ कॉमेंट

  1. बैलबाझार स्मशानभूमि चे बाज़ुला दिशासूचक ख़ांब वर नेहमीच कोणी ने कोणी पार्टयांचे कार्यकर्तेचे वाढदिवसाचा बैनर लावलेले अस्तात, क.डो.म.पांनी सदरचा खाँब राजकीय पक्षानां भाड्यानी द्यायचा शुरु केलेले आहे का?
    जर तसा असल्यास सर्व सामान्य प्रजाला सुद्धा हे दिशा व किलोमीटर सुचक खांब भाड्याने देणे आहे या पद्धतिने द्यायचे शुरु करुन टाँका.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा