Home कोरोना गुडन्यूज ; 9 महिन्यांनंतर कल्याण डोंबिवलीत आज एकही कोरोना मृत्यू नाही

गुडन्यूज ; 9 महिन्यांनंतर कल्याण डोंबिवलीत आज एकही कोरोना मृत्यू नाही

 

कल्याण / डोंबिवली दि.5 जानेवारी :
संपूर्ण एमएमआर रिजनमध्ये मुंबईपाठोपाठ कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या कल्याण डोंबिवलीमधून एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. कोरोना आल्यापासून गेल्या 9 महिन्यात पहिल्यांदाच आज एकही कोरोना मृत्यू झाला नसल्याची पॉझिटीव्ह माहिती केडीएमसी आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.
कोरोना आल्यानंतर 11 मार्चला कल्याण डोंबिवलीमध्ये पहिला रुग्ण आढळला होता. तर 4 एप्रिल 2020 ला पहिला कोरोना मृत्यू झाला होता. तर जून महिन्यात कल्याण डोंबिवली क्षेत्रात कोरोनाच्या रुग्णांनी कळस गाठत एकाच दिवसात 600 पेक्षा अधिक रुग्ण आढळले होते. दरम्यान कल्याण डोंबिवलीतील कोरोनाचा मृत्यूदर इतर ठिकाणपेक्षा कमी असला तरी दररोज 1-2 मृत्यूची नोंद होतच होती. मात्र तब्बल 9 महिन्यांनंतर आज म्हणजेच 5 जानेवारी 2021 रोजी एकही कोरोना मृत्यू झाला नसल्याची माहिती साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली आहे. आतापर्यंत 1 हजार 110 रुग्णांचा मृत्यू झाला असून 897 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
एकेकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट असणाऱ्या कल्याण डोंबिवलीकरांसाठी ही अत्यंत दिलासादायक अशी माहिती आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा