Home ठळक बातम्या महाराष्ट्रातील सरकार कोसळणार नाही;आणखी ताकदीने राज्याचा विकास करणार – केंद्रीय मंत्री अनुराग...

महाराष्ट्रातील सरकार कोसळणार नाही;आणखी ताकदीने राज्याचा विकास करणार – केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

कल्याण लोकसभेच्या दुसऱ्या दौऱ्यावर आलेत अनुराग ठाकूर

डोंबिवली दि.14 फेब्रुवारी :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील सरकार कोसळण्यासाठी विरोधी पक्ष मोठी आस लावून बसला आहे. मात्र त्यांच्या पदरी निराशा येणार असून हे सरकार आणखी ताकदीने महाराष्ट्राचा विकास करेल असा विश्वास केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केला. अनुराग ठाकूर हे कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दुसऱ्या दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. (Government in Maharashtra will not collapse; will develop the state with more strength – Union Minister Anurag Thakur)

म्हणून देशाला पुन्हा नरेंद्र मोदी यांची गरज….
कल्याणचे लोकसभा क्षेत्रात आमचा पक्ष संघटनात्मक आणि लोकप्रियतेबाबत मजबूत होण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहोत. संघटनेच्या दृष्टीने हा प्रवास असून भाजप कार्यकर्त्यांवर अवलंबून आहे. आम्ही सत्तेत असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संघटनेप्रती असणारे कर्तव्य आणि दायित्व निभावत असल्याचे ठाकूर यांनी यावेळी स्पष्ट केले. तर आमच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याच्या मूळ विचारावर काम सुरू असून सत्तेमध्ये येऊनही आम्ही सेवाभाव जपला आहे. देशाच्या आजच्या प्रगतीमध्ये नरेंद्र मोदी सरकारचे खूप मोठे योगदान असून एक मजबूत देश म्हणून जडण घडण होण्यासाठी देशाला नरेंद्र मोदी यांची पुन्हा गरज असल्याचेही अनुराग ठाकूर यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या पारड्यात भरभरून विकासकामे…
यूपीए सरकारने गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्राला जे दिले नाही त्यापेक्षा कित्येक पट अधिक मोदी सरकारने दिले आहे. मग ते रेल्वे असो, रस्ते असो की मेट्रो प्रकल्प. हे केंद्र सरकार मनमोकळेपणाने राज्यातील भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षासाठी सर्व काही करत आहे आणि यापुढेही करत राहील अशी ठाम भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली.

कल्याण लोकसभा मतदारसंघात एकत्र लढणार…
कल्याण लोकसभा मतदारसंघात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप आम्ही एकत्रितपणे अधिक लक्ष देऊन लढू. तसेच यापूर्वी मिळालेल्या यशापेक्षा अधिक मतांनी विजय प्राप्त करण्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी आमदार संजय केळकर, गणपत गायकवाड, कुमार आयलानी यांच्यासह जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी आमदार नरेंद्र पवार, माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा