Home क्राइम वॉच प्रॉपर्टीच्या वादातून नातवाने केली आजोबांची हत्या; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

प्रॉपर्टीच्या वादातून नातवाने केली आजोबांची हत्या; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

 

कल्याण दि.14 मार्च :
प्रॉपर्टीच्या वादातून नातवानेच आजोबांची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना रविवारी सकाळी कल्याण पश्चिमेच्या बेतूरकर पाडा परिसरात घडली. याप्रकरणी आरोपी नातवाला महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

नारायण ठाणगे (55) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून हे सर्व कुटुंबिय कल्याणच्या बेतूरकर पाडा परिसरात राहतात. नारायण आणि कुंडलिक ठाणगे यांनी 2012 मध्ये एक प्रॉपर्टी विकसीत करण्यासाठी दिली होती. तेव्हा विकासकाने दिलेल्या एका गाळ्यावरून नारायण आणि कुंडलिक यांच्यात वाद सुरू आहेत. हा वाद कल्याणच्या दिवणी न्यायालयात गेला असून त्याबाबतचा खटला सध्या सुरू आहे. त्यानंतरही या कुटुंबियांमध्ये आज सकाळी पुन्हा वाद झाला. ज्याचे पर्यवसान नंतर हाणामारीत होऊन रागाच्या भरात हर्षलने त्याचे आजोबा नारायण ठाणगे आणि काका दिनेश यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची माहिती एसीपी अनिल पोवार यांनी दिली. या हल्ल्यात  नारायण ठाणगे यांचा मृत्यू झाला तर दिनेश ठाणगे हे जखमी झाले आहेत.

याप्रकरणी दिनेश ठाणगे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून महात्मा फुले पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्याचेही एसीपी अनिल पोवार यांनी सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा