Home ठळक बातम्या कल्याणातील ‘देवगंधर्व महोत्सवा’ला संगीतप्रेमींचा मोठा प्रतिसाद

कल्याणातील ‘देवगंधर्व महोत्सवा’ला संगीतप्रेमींचा मोठा प्रतिसाद

कल्याण दि.24 जानेवारी :
केवळ कल्याणात नव्हे तर सांगीतिक क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या कल्याण गायन समाज आयोजित 19 व्या देवगंधर्व महोत्सवाला संगीतप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाले. एरव्ही तीन दिवस चालणारी ही सांगितिक मेजवानी यंदा मात्र कोरोनामुळे एकाच दिवसासाठी आयोजित करण्यात आली होती.

कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरातील शास्त्रीय संगीतप्रेमींसाठी देवगंधर्व महोत्सव म्हणजे जणू काही शास्त्रीय संगीताचा कुंभमेळा. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कल्याणची ओळख असणारा हा महोत्सव होईल की नाही याबाबत प्रश्नचिन्ह होते. मात्र दरवर्षीप्रमाणे न करता एक दिवसासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे यंदा हा महोत्सव विनाशुल्क असणार असून डॉ. वरदा गोडबोले, चिराग कट्टी, सत्यजित तळवलकर, ऋतुजा सोमण, पंडित चंद्रशेखर वझे, ओजस अढीया, मानस कुमार आदी नामांकितांनी सादर केलेल्या कलेला रसिक प्रेक्षकांनी मनमुराद दाद दिल्याची माहिती कल्याण गायन समाजाचे प्रतिनिधी प्रशांत दांडेकर यांनी दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा