Home ठळक बातम्या कल्याण ग्रामीणमधील शासकीय रुग्णालयाची जागा ठाणे जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचे पालकमंत्री एकनाथ...

कल्याण ग्रामीणमधील शासकीय रुग्णालयाची जागा ठाणे जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

 

मनसे आमदर राजू पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

कल्याण दि.19 जानेवारी : 
कल्याण ग्रामीणमधील दहिसर – नावाळी गावात असणारी प्रशस्त शासकीय रुग्णालयाची जागा नवी मुंबई महापालिकेने ठाणे जिल्हा परिषदकडे तातडीने वर्ग करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकित दिल्याची दिले आहेत. बंद असणारे हे आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी आमदार राजू पाटील यांनी पाठपुरावा केला आहे.

नावाळी गावात असणारी प्रशस्त शासकीय रुग्णालयाची जागा गेले कित्येक वर्ष बंद होती. परिणामी ग्रामस्थांना आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागण्यासह कोरोना काळातही नागरिकांची गैरसोय झाल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. तर लसीकरण किंवा उपचारासाठी इथल्या नागरिकांना निळजे आरोग्य केंद्रावर धाव घ्यावी लागत असल्याने हे आरोग्यकेंद्र सुरू करण्याची मागणी ग्रामस्थ आणि विकास समितीतर्फे करण्यात आली होती. मात्र या रुग्णालय हस्तांतरणाअभावी हा प्रश्न प्रलंबित असल्याने हे रुग्णालय बंद अवस्थेत आहे. हीच बाब मनसे आमदार राजू पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर हे आरोग्यकेंद्र सुरू करण्याकरता आणि नवी मुंबई पालिकेकडून जिल्हापरिषद वर्ग करण्यासाठी मनसे आमदार यांनी पाठपुरावा केला. त्या पाठपुराव्याला यश आले असून नावाळी येथील जागा नवी मुंबई महापालिकेने ठाणे जिल्हा परिषदकडे तातडीने वर्ग करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकित दिले. त्यामुळे या रुग्णालय हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लागणार असून त्याबद्दल मनसे आमदर राजू पाटील यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

मागील लेखक्या बात है: शहर सौंदर्यीकरणासाठी आता नागरिकांनीही घेतला पुढाकार
पुढील लेखनावाळी आरोग्य केंद्रासह महत्वाचे प्रकल्प जिल्हा नियोजन बैठकीत मार्गी – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा