ज्ञान, सर्जनशीलता आणि देशभक्तीला प्रोत्साहन
कल्याण | ७ ऑगस्ट :
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत गुरुकुल सायन्स क्लासेसतर्फे ‘उत्सव आजादी का – २०२६’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. “Celebrating Freedom Through Knowledge, Creativity & Patriotism” या संकल्पनेवर आधारित या स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना, ज्ञानवृद्धी आणि सर्जनशीलतेला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. (Gurukul Science Classes Launches ‘Utsav Azaadi Ka 2026’ with Exciting Independence Day Competitions for Students)
या स्पर्धांमध्ये इयत्ता ८ वी, ९ वी आणि १० वी मधील विद्यार्थी सहभागी होऊ शकणार असून, प्रत्येक विद्यार्थ्याला जास्तीत जास्त दोन स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याची संधी देण्यात आली आहे. सहभागासाठी पूर्वनोंदणी अनिवार्य असून विद्यार्थ्यांनी शाळेचे ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक असल्याची माहिती गुरुकुल सायन्स क्लासचे संचालक वैभव ठाकरे यांनी दिली.
स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी, Certificate of Excellence, शैक्षणिक गिफ्ट हॅम्पर्स / पुस्तके तसेच गुरुकुल स्कॉलरशिप व्हाउचर प्रदान करण्यात येणार आहेत. याशिवाय प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्र आणि समूह छायाचित्र देण्यात येणार आहे.
स्पर्धेदरम्यान शिस्त पाळणे बंधनकारक असून मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सना परवानगी नसले, कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारावर संबंधित स्पर्धकास अपात्र ठरविण्यात येईल. स्पर्धेतील परीक्षकांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक राहील. या उपक्रमाच्या कल्याण विभागाच्या समन्वयक म्हणून काश्मिरा बर्दापूरकर या काम पाहणार असून, विद्यार्थी आणि पालकांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहनही संचालक वैभव ठाकरे यांनी केले आहे.
नोंदणी – अधिक माहितीसाठी संपर्क :
📞 ९८३३८ ०६४६४

