Home ठळक बातम्या अत्यंत हृदयद्रावक : लाडक्या कुत्र्याची आंघोळ बेतली भावा-बहिणीच्या जिवावर

अत्यंत हृदयद्रावक : लाडक्या कुत्र्याची आंघोळ बेतली भावा-बहिणीच्या जिवावर

 

डोंबिवली दि.28 मे :
डोंबिवली पूर्वेच्या दावडी परीसरात आज दुपारी एक अत्यंत हृदयद्रावक अशी घटना घडली आहे. आपल्या लाडक्या लॅब्रेडॉरची (labrodar dog) आंघोळ दोघा भावा बहिणींच्या जिवावर बेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दावडी गावातील तलावात बुडून या दोघांचा मृत्यू झाला. (Heartbreaking: A beloved dog’s bath costs a sibling’s life)

कीर्ती रविंद्रन आणि रणजित रविंद्रन अशी या दोघा बहीण भावाचे नाव आहे. हे दोघे जण आपल्या लाडक्या लॅबला आंघोळ घालण्यासाठी गावातील तलावात गेले होते. त्यावेळी तलावातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

दरम्यान पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने तब्बल दोन तास शोधकार्य करून भावा बहिणीचे मृतदेह बाहेर काढले. हे दोघेही महाराष्ट्र नगर येथे राहत होते. त्यांच्या या अशा दुर्दैवी मृत्यूची माहिती समजताच महाराष्ट्र नगरवर एकच शोककळा पसरली आहे.

विशेष म्हणजे कीर्तीचा नुकताच अकरावीचा रिझल्ट लागला होता आणि त्यात तिला ९८ टक्के मार्क मिळाले होते. तर रणजीत हा एमबीबीएस करत होता.

मागील लेखमहावितरणची धडक कारवाई : ९ आलिशान फार्महाऊसकडून ३० लाखांची वीजचोरी उघडकीस
पुढील लेखआंतरराष्ट्रीय सायकल दिन आणि पर्यावरण दिनानिमित्त कल्याणात सायकल रॅलीचे आयोजन

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा