Site icon LNN

कल्याण-डोंबिवलीमध्ये उष्णतेचा कहर सुरुच; तापमान पोहोचले ४३ अंशांपार

मोसमातील दुसऱ्या उच्चांकी तापमानाची नोंद

कल्याण | 9 मे :
कल्याण-डोंबिवलीसह संपूर्ण एमएमआर आणि अंतर्गत कोकण परिसरात शनिवारी उष्णतेची तीव्र लाट अनुभवायला मिळाली. प्रखर उन्हामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले असून कल्याणमध्ये ४३.१°C तर डोंबिवलीमध्ये ४२.८°C पर्यंत पोहोचल्याची नोंद झाली आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील हे दुसरे सर्वात उच्चांकी तापमान असल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी एलएनएनशी बोलताना दिली. (Heatwave Continues in Kalyan-Dombivli; Temperature Crosses 43°C)

हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार, दिवसभराच्या तीव्र उन्हानंतर समुद्राकडून आलेल्या दमट वाऱ्यांमुळे वातावरणातील आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे ‘रिअल फील’ तापमान तब्बल ५० ते ६०°C पर्यंत जाणवत होते. आजच्या या उकाड्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

कल्याण डोंबिवलीसोबतच घोडबंदर, मुंब्रापासून ते अंबरनाथ, बदलापूरमध्येही आज 43 अंश सेल्सिअसहून अधिक तापमानाची नोंद झाली आहे. जे गेल्या 13 वर्षांतील सर्वात उच्चांकी तापमान असल्याचेही मोडक यांनी सांगितले.

दरम्यान, संध्याकाळी अचानक हवामानात बदल होऊन काही भागांमध्ये धुळीचे वादळ आणि जोरदार वारे वाहू लागले. अवघ्या ३० मिनिटांत वातावरणात मोठा बदल झाल्याने अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटणे, पत्रे उडणे तसेच वीजवाहिन्यांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या.

एमएमआर आणि कोकणातील विविध शहरांमधील कमाल तापमान पुढीलप्रमाणे नोंदविण्यात आले :

🔸 सुकसळे – ४४.१°C
🔸 पलावा– ४३.६°C
🔸 नेरळ – ४३.५°C
🔸 अंबरनाथ – ४३.४°C
🔸 भातसानगर – ४३.३°C
🔸 कर्जत – ४३.२°C
🔸 कल्याण – ४३.१°C
🔸 चिपळूण – ४३°C
🔸 बदलापूर – ४२.९°C
🔸 डोंबिवली – ४२.८°C
🔸 बिरवाडी – ४२.७°C
🔸 मुंब्रा – ४२.५°C
🔸 तळोजा – ४१.९°C
🔸 ठाणे – ४०.२°C
🔸 नवी मुंबई विमानतळ – ४०.५°C
🔸 वाशी – ३९.४°C

तर किनारपट्टी भागातही तापमानात वाढ झाली असून :

🔹 रत्नागिरी – ३६.९°C
🔹 डहाणू – ३६.३°C
🔹 देवनार – ३६.२°C
🔹 दादर – ३६.१°C
🔹 विरार-उत्तन – ३६°C
🔹 मुंबई SCZ – ३५.६°C

हवामान विभागाने पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली असून, नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version