24 तासांत कल्याण डोंबिवलीमध्ये तब्बल 118 मिलिमीटर पाऊस
कल्याण डोंबिवली दि.25 जुलै :
कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे कल्याणच्या खाडीसह गांधारी परिसरातील नद्यांचे पात्र प्रचंड प्रमाणत विस्तारले आहे. त्यामुळे हा पाऊस असाच सुरू राहिला तर खाली आणि नदीकिनाच्या सकल भागात हे पाणी शिरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(Heavy rain in areas including Kalyan Dombivli; The course of the rivers expanded along with the bays)
तसे पाहायला गेलं तर गेल्या तीन-चार दिवसांपासून कल्याण डोंबिवली पावसाची बॅटिंग सुरू आहे. परंतु काल रात्रीपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यासोबतच टिटवाळा, अंबरनाथ उल्हासनगर , बदलापूर या भागातही तुफान पाऊस सुरू आहे. परिणामी येथून येणाऱ्या उल्हास तसेच काळू नद्यांमधील पाण्याची पातळी प्रचंड वाढली आहे. उल्हास आणि काळू या दोन्ही नद्या कल्याणच्या गांधारीजवळ एकत्र येत असून त्या ठिकाणी असणारे दत्त मंदिर मठ आणि परिसर पाण्याखाली गेल्यामुळे त्याचा संपर्क तुटला आहे. कल्याण पश्चिम नव्याने बांधण्यात आलेल्या रिंग रोडच्या परिसरापर्यंत हे पाणी आले असून असाच पाऊस सुरू राहिला तर ते रिंग रोडवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या 24 तासांत कल्याण डोंबिवलीमध्ये तब्बल 118 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून
नदी आणि खाडीचे हे विस्तारलेले स्वरूप पाहता शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवरती गेल्या आहेत.
कल्याणच्या रिंग रोड परिसरातील परिस्थिती…(फोटो सौजन्य – पंकज सिंग)