Home Uncategorised कल्याण, अंबरनाथ, मुरबाडसह ग्रामीण भागात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

कल्याण, अंबरनाथ, मुरबाडसह ग्रामीण भागात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

कल्याण दि.14 एप्रिल :
कल्याण शहर आणि ग्रामीण भागासह अंबरनाथ परिसराला आज संध्याकाळी अवकाळी पावसाने झोडपून काढले. सुरुवातीला थेंब थेंब पडणाऱ्या पावसाचा नंतर अचानक वेग वाढला आणि विजांच्या लखलखाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. मात्र मुरबाडमध्ये वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसाने काही ठिकाणी नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अंबरनाथ आणि परिसरात अंबरनाथमध्ये पाऊस पडू लागला आणि नंतर अर्ध्या तासातच त्याने कल्याण गाठले. सुरुवातीला थेंब थेंब पडणाऱ्या पावसाने अवघ्या काही मिनिटांतच जोरदार बरसण्यास सुरुवात केली. त्याच्या जोडीला विजांचा लखलखाटही सुरू होता. अचानक आलेल्या या अवकाळी पावसाने सहकुटूंब घराबाहेर पडलेल्या लोकांची चांगलीच धावपळ झाली. दरम्यान पावसाला सुरुवात होऊन काही मिनिटंही होत नाहीत तर कल्याणातील विविध परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

परंतु मुरबाडमध्ये वादळी वाऱ्यांसह झालेल्या मुसळधार पावसाने काही ठिकाणी नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र या नुकसानाची नेमकी माहिती समजू शकली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*