Home राजकीय घडामोडी महाड पूरग्रस्तांसाठी रमेश म्हात्रे यांच्याकडून 500 किलो खाद्यतेल

महाड पूरग्रस्तांसाठी रमेश म्हात्रे यांच्याकडून 500 किलो खाद्यतेल

 

डोंबिवली दि.27 जुलै :
कोकणातील चिपळूण, महाड परिसरात महापुराने अक्षरशः संसार उघड्यावर आणले. एका क्षणात या महापुराने होत्याचं नव्हतं करून टाकलं. या पार्श्वभूमीवर एक मदतीचा हात म्हणून शिवसेना डोंबिवली शहर शाखेतर्फे जीवनावश्यक साहित्याची मदत पाठवली जाणार आहे. यामध्ये डोंबिवलीचे ज्येष्ठ लोकप्रतिनिधी रमेश म्हात्रे यांनी तब्बल 500 किलो खाद्यतेल देत सिंहाचा वाटा उचलला आहे. लवकरच ही सर्व मदत महाड आणि चिपळूणला रवाना केली जाणार आहे. शिवसेनेचे पदाधिकारी मनोज रमेश म्हात्रे यांच्या हस्ते ही मदत शिवसेना मध्यवर्ती शाखेकडे सुपूर्द करण्यात आली.
पुराने कोकणवासियांचे संपूर्ण संसार उद्ध्वस्त केले आहेत. अशावेळी आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी आणि त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहणे आवश्यक आहे. या विचाराने आपण मदतीसाठी हा खारीचा वाटा उचलला अशी प्रतिक्रिया रमेश म्हात्रे यांनी दिली.

मागील लेखगांधारी पुलाच्या खांबाला अडकलेल्या काळ्या कपड्याने उडवली प्रशासनाची झोप
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 52 रुग्ण तर 76 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा