Home बातम्या कोकणातील पुरग्रस्तांसाठी कल्याणकर आणि मैत्री फाऊंडेशनतर्फे ‘एक हात मदतीचा’

कोकणातील पुरग्रस्तांसाठी कल्याणकर आणि मैत्री फाऊंडेशनतर्फे ‘एक हात मदतीचा’

 

कल्याण दि.3 ऑगस्ट :
काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात भयानक पूरस्थिती तयार होऊन बऱ्याच भागात पाणी साचून अनेकांचे संसार उध्वस्त झाले. त्यांचे संसार पुन्हा उभा करण्यासाठी कल्याणातील मैत्री आणि कल्याणकर फाऊंडेशनतर्फे जीवनावश्यक तसेच इतर वस्तूंची मदत करण्यात आली. या दोन्ही सामाजिक संस्थांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पुरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले होते. ज्याला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.

या आवाहनाला केवळ कल्याणातूनच नव्हे तर कल्याणसह डोंबिवली, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, पनवेल, नागोठणे, वडखळ परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कल्याण पूर्वेतील मैत्री फाऊंडेशनचे संस्थापक गणेश लोहोटे आणि कल्याणकर फाऊंडेशनचे संस्थापक कुणाल कांबळे यांच्याकडे भरभरून मदत जमा झाली. त्यातही के. एम. कुंदणानी फार्मसी पॉलिटेक्निक कॉलेजतर्फे सर्वात मोठी मदत मिळाल्याची माहिती कुणाल कांबळे यांनी दिली.
ही सर्व मदतीचे कल्याणकर आणि मैत्री फाउंडेशनच्या तेजस विलास विरकर, निलेश गजकोष, पूनम सागवेकर, पूजा सागवेकर गोविंद ठाकूर, ऋतिक वायळ या सर्व पदाधिकारी-सदस्यांनी चिपळूण, पोलादपूर, महाडमधील बिरवाडी, राजेवाडी, सुतारवाडी, बौद्धवाडी या भागात वाटप करण्यात आले.
या उपक्रमासाठी मिळालेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल मैत्री आणि कल्याणकर फाऊंडेशनतर्फे लोकांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

मागील लेखकेडीएमसी क्षेत्रात उद्या (3 ऑगस्ट) 2 ठिकाणी लसीकरण ; कोव्हॅक्सीनचे दोन्ही डोस मिळणार
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 73 रुग्ण तर 85 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा