Home ठळक बातम्या ‘गरिबांच्या पाठीवर मायेची ऊब’ देण्यासाठी हवीय मदत – सामाजिक संस्थेचे आवाहन

‘गरिबांच्या पाठीवर मायेची ऊब’ देण्यासाठी हवीय मदत – सामाजिक संस्थेचे आवाहन

थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन टाळून साजरा होतो सामाजिक उपक्रम

कल्याण दि.३० नोव्हेंबर :
थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांचे झिंगाट सेलिब्रेशन टाळून त्याच पैशांतून गरिबांच्या पाठीवर मायेची ऊब देणारी ‘ह्यूमॅनिटी स्टील अलाईव्ह’ ही संस्था गेल्या ९ वर्षांपासून आपला सामाजिक उपक्रम राबवत आहे. यंदाच्या थर्टी फर्स्टच्या रात्रीही हा उपक्रम राबविण्यात येणार असून अधिकाधिक गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी दानशूर व्यक्तींनी मदत करण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष तेजस रमेश सांगळे यांनी केले आहे.

थर्टी फर्स्ट अर्थातच ३१ डिसेंबरला मध्यरात्री नविन वर्षाचे जोरदार सेलिब्रेशन होत असते. मात्र कल्याणातील ह्यूमॅनिटी स्टील अलाईव्ह ही संस्थेच्या सदस्यांनी मात्र या सेलिब्रेशनला छेद देत एक स्तुत्य असा सामाजिक उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचे यंदाचे १० वे वर्ष असून त्याचे औचित्य साधून अधिकाधिक गरजूंपर्यंत हा उपक्रम पोहोचवण्याचा संस्थेचा मानस असल्याचे तेजस सांगळे यांनी सांगितले. या उपक्रमाअंतर्गत जमा होणाऱ्या निधीतून ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री गरजूंना ब्लँकेट तसेच खाद्य पदार्थ वितरीत केले जातात.

या चांगल्या उपक्रमासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन आपल्या परीने आर्थिक मदत करण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष तेजस सांगळे यांनी केले आहे.

ह्यूमॅनिटी स्टील अलाईव्ह,

तेजस रमेश सांगळे – अध्यक्ष

गुगल पे नंबर – 88989 30784

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा