Home ठळक बातम्या हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी संविधानात आणखी एक सुधारणा व्हावी – ऍड. वीरेंद्र...

हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी संविधानात आणखी एक सुधारणा व्हावी – ऍड. वीरेंद्र इचलकरंजीकर

 

कल्याण दि.5 फेब्रुवारी :
‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानात आतापर्यंत 103 सुधारणा झाल्या असून आणखी एका सुधारणेद्वारे हिंदु राष्ट्राची निर्मिती करू असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केले. 3 फेब्रुवारी रोजी कल्याणात हिंदु जनजागृती समितीतर्फे आयोजित हिंदु राष्ट्र जागृती सभेत ते बोलत होते.

लोक दारू पित असतांना बारबालांनी त्यांच्यापुढे नाचावे की नाही, समलैंगिक संबंध ठेवावेत की नाही, हे ऐकायला सर्वोच्च न्यायालयाला वेळ आहे; परंतु न्यायालयाला गेली 8 वर्षे श्रीराम मंदिराची याचिका ऐकायला वेळ नाही, हे आमचे दुर्दैव असल्याचे मतही इचलकरंजीकर यांनी यावेळी व्यक्त केले.

तर ‘हिंदुराष्ट्र’ हा केवळ चार अक्षरांनी बनलेला शब्द नाही, तर तो मंत्र आहे. आज जर हिदु राष्ट्रासाठी संघर्ष केला नाही, तर हिंदुस्थानचा पाकिस्तान कधी होईल, हे सांगता येत नाही. देशद्रोही वृत्तींच्या विरोधात लढा देण्यासाठी आम्हीही शिवरायांचे मावळे होऊ असे मत हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक सुमित सागवेकर यांनी व्यक्त केले.

तसेच बहुसंख्य असूनही हिंदुस्थानात हिंदूंना अपमानीत व्हावे लागत आहे, हे आमचे दुर्दैव आहे. हिंदूंच्या रूढी-परंपरा यांच्यावर आघात केले जात आहेत. येथे पाश्‍चात्यांची ‘डे’ संस्कृती रुजवण्यासाठी पैसे पुरवले जात आहेत. गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर यासारख्या समस्यांवर हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हा एकच उपाय आहे. हिंदु राष्ट्र हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. आम्ही अखंड हिंदु राष्ट्राची स्थापना केल्यविना स्वस्थ बसणार नाही असे लष्कर-ए-हिंद संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*