कल्याण डोंबिवली दि.18 ऑगस्ट :
हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील सर्व शाळांना महापालिका प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे. केडीएमसी शिक्षण विभागाचे उपआयुक्त संजय जाधव यांच्याकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यमाच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना उद्या मंगळवार 19 ऑगस्ट 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.