Home ठळक बातम्या ठाणे जिल्ह्यात 29 एप्रिलला मतदानासाठी पगारी सुट्टी जाहीर; सुट्टी न दिल्यास कारवाईचा...

ठाणे जिल्ह्यात 29 एप्रिलला मतदानासाठी पगारी सुट्टी जाहीर; सुट्टी न दिल्यास कारवाईचा इशारा

 

ठाणे दि.16 एप्रिल :
लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचे सोमवारी 29 एप्रिल रोजी ठाणे जिल्ह्यात मतदान होणार असून मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने व आस्थापना वगळून सर्व दुकाने, आस्थापना, कारखाने येथील कामगार कर्मचारी व अधिकाऱ्यांना पगारी सुटृी देण्यात येत आहे. ठाणे जिल्हा कामगार उपायुक्तांनी त्याबाबत निर्देश दिले आहेत.या मतदानासाठी पगार कपात करण्यात येवू नये. मतदानाच्या दिवशी अत्यावश्यक सेवा दुकाने व आस्थापना वगळून सर्व आस्थापना सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळात बंद ठेवव्यात असे आवाहनही कामगार उपायुक्तांनी केले आहे.

केवळ अपवादात्मक परिस्थितीत कामगार,अधिकारी,कर्मचारी इत्यादीना पुर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी सुट्टीऐवजी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत संबंधित आस्थापनांनी महानगरपालिका आयुक्त अथवा जिल्हाधिकाऱ्यांची पुर्वपरवानगी घेणे आवश्यक असणार आहे.

कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घ्यायची आहे. याबाबत कामगार किंवा कामगार संघटनांच्या तक्रारी असल्यास त्यांनी संबंधित उपआयुक्त कार्यालयाशी किंवा उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा संचालनालय,ठाणे यांच्याशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्यास किंवा मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास अशा आस्थापनोविरोधात योग्य ती कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

*#LNN*
*#LoksabhaElection2019*
*#LocalNewsNetwork*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*