कल्याण पूर्वेत शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधत कोरोना योद्धांचा सन्मान; सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचा उपक्रम

   

  कल्याण दि.19 फेब्रुवारी :
  सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ कल्याण पूर्वच्या विद्यमाने आयोजित ‘शिवजयंती उत्सवा’मध्ये कोरोना काळात स्वःताच्या जिवाची पर्वा न करता काम करणाऱ्या व्यक्तींचा ‘कृतज्ञता सन्मानपत्र’ गुलाब पुष्प आणि ऐतिहासिक पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. कोरोनाच्या वाढत्या धोक्याची चाहूल लक्षात घेता मर्यादित निमंत्रितांच्या उपस्थितीत तिसाई देवी मंदीराच्या प्रांगणात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .

  प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगवान भोईर तसेच आमदार गणपत गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर बासरीवाला ढोल पथकाने तालबद्द गजरात महाराजांना मानवंदना दिली. याच दरम्यान समारंभस्थळी आगमन झालेल्या महाराजांच्या पालखीचे ‘मानवी पायघड्या ‘ घालुन जल्लोषात स्वागत करण्यात आले .

  तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शाहूराजे साळवे, प्रभाग ५ ड चे प्रभाग क्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे, प्रभाग ४ जे चे प्रभाग क्षेत्र अधिकारी भरत पाटील आदींच्या उपस्थितीत पोलिस कर्मचारी, सफाई कामगार, डॉक्टर्स, नर्सेस यांचा ‘कृतज्ञता सन्मानपत्र’ देऊन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर कोरोना कालावधीत माहीती आणि जनजागृतीचे काम करणाऱ्या प्रिन्ट / इलेक्ट्रानिक मिडीयातील आनंद गायकवाड, कुणाल म्हात्रे, अशोक कांबळे आदी पत्रकारांचाही कृतज्ञता सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

  या कार्यक्रमास माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनीही भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना वंदन केले .या शिवजयंती उत्सव कार्यक्रमास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगवान भोईर, विद्यमान अध्यक्ष रुपेश गायकवाड, कार्याध्यक्ष अभिमन्यु गायकवाड, सचिव राजेश अंकुश, तसेच विश्वस्त मंडळाचे सदस्य नरेंद्र सुर्यवंशी, वसंतराव सुर्यवंशी, अनिल घुमरे, के.एल. वासनकर यांच्यासह जरीमरी सेवा मंडळाचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, ग्रामस्थ पंच कमिटीचे सुनिल गायकवाड, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी जगदीश लोहळकर आदी मान्यवर उपस्थित होते .

  The device helps them understand how to control their excitement and decrease stimulation once they arrive at a certain level. Premature ejaculation is a condition shrouded in shame and embarrassment, Prof Chung said, but advised men suffering to seek professional medical assistance. Log in Sign up. cialis malaysia Log out.

  तुमची प्रतिक्रिया लिहा

  तुमची कंमेंट लिहा
  तुमचे नाव लिहा