Home कोरोना कल्याण डोंबिवलीत नियमांचे उल्लंघन करणारे हॉटेल,बार आणि दुकाने केडीएमसीकडून सील

कल्याण डोंबिवलीत नियमांचे उल्लंघन करणारे हॉटेल,बार आणि दुकाने केडीएमसीकडून सील

कल्याण दि.11 जुलै :
कल्याण डोंबिवलीत सध्या कोवीड 3 अंतर्गत निर्बंध लागू असूनही गेल्या काही दिवसांपासून त्याचे उल्लंघन सुरूच होते. त्यामूळे केडीएमसी प्रशासनाने कोवीड नियम उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, बार आणि दुकानांवर कारवाई केली.

कल्याण डोंबिवली महापालिका महापालिका क्षेत्रात लेव्हल 3 अंर्तगत सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा असून अत्यावश्यक नसणारी दुकाने शनिवारी आणि रविवारी पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. मात्र या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी कारवाई केली. तर कोवीड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व प्रभागामधील फेरीवाल्यांवरही कारवाई करत हे फेरीवाले हटवण्यात आले.

तर दुपारी ४ नंतरही नियमांचे उल्लंघन करून कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरातील हॅाटेल दिपक, दिक्षा बार आणि डोंबिवलीतील बंदिश पॅलेस बार, साई पूजा बार सुरूच असल्याचे निदर्शनास आल्याने ते सील करण्यात आले. जे प्रभागामधील पुना लिंक रोडवरील सिरॅमिकची दुकाने, मोमीन टेलीकॅाम आदी दुकानेही नियमांचे उल्लंघन केल्यामुळे सील करण्यात आली.

त्याचसोबत सार्वजनिक मैदाने, बगीचे येथे सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंतच सुरू ठेवणे आवश्यक आहे. तथापी त्यानंतरही अशा ठिकाणी अनेक नागरिक उपस्थित असल्याचे दिसून आल्याने नागरिकांना बाहेर काढण्यात आले. ही कारवाई यापूढेही अशीच सुरू राहणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा