Home कोरोना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या व्हर्च्युअल ग्लोबल मॅराथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या व्हर्च्युअल ग्लोबल मॅराथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

डोंबिवली दि.8 जानेवारी :
कोरोनाशी लढताना शहीद झालेल्या देशभरातील डॉक्टरांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे ‘लाईफ सेव्हर्स रन’ या व्हर्चुअल ग्लोबल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. ज्याला जगभरात डॉक्टरांसह सामान्य नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

कोरोना आल्यापासून त्याच्याशी लढताना देशभरात आतापर्यंत ७३६ डाॅक्टर्स कोरोना रूग्णांवर उपचार करतांना शहीद झाले आहेत. त्यांना मानवंदना देण्यासाठी ‘इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे देशभरात हा उपक्रम राबविण्यात आला. या व्हर्च्युअल मॅरेथॉनला वर्ल्ड मेडिकल असोसिएशन (WMA)नेही पाठिंबा दिला होता. या मॅरेथॉनच्या माध्यमातून गोळा झालेला निधी आयएमए मुख्यालयाच्या कोवीड मार्टियर फंड (COVID MARTYR FUND) मध्ये जमा केला जाणार आहे. ज्याद्वारे या कोविड हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचे डोंबिवली आयएमएतर्फे सांगण्यात आले. या मॅरेथॉनमध्ये वैद्यकीय, व्यावसायिक, नॉन मेडिको, मॅरेथॉनर, हौशी धावपटू सहभागी झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा