Home ठळक बातम्या जलवाहिनीचा एअरव्हॉल्व्ह फुटल्याने शेकडो लिटर पाणी वाया

जलवाहिनीचा एअरव्हॉल्व्ह फुटल्याने शेकडो लिटर पाणी वाया

 

कल्याण दि.2 जानेवारी :
मुख्य जलवाहिनीचा एअरव्हॉल्व्ह फुटल्याने शेकडो लिटर पाणी वाया गेले आहे. कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज रोड परिसरात हा प्रकार घडला. मुख्य जलवाहिनी असल्याने पाण्याचा प्रवाह इतका जबरदस्त होता की याठिकाणी 10 फुटांचे भलेमोठे कारंजे तयार होण्यासह रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
हा एअरव्हॉल्व्ह नेमका कशामुळे फुटला याबाबत निश्चित माहिती मिळू शकली नसली तरी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनाची धडक बसून तो तुटला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. हा प्रकार समजताच केडीएमसीकडून संबंधित जलवाहिनीचा पाणी पुरवठा बंद करून तातडीने या जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा