Home क्राइम वॉच टँकरमधील केमिकल पडून कल्याणमध्ये पती पत्नी गंभीर जखमी

टँकरमधील केमिकल पडून कल्याणमध्ये पती पत्नी गंभीर जखमी

 

कल्याण दि.26 डिसेंबर :
कल्याण पश्चिमेतील वालधुनी येथील आंबेडकर चौकात रस्त्यावर जाणाऱ्या एका केमिकल टँकरचे झाकण अचानक लीक झाल्याने टँकरच्या बाजूने दुचाकीवर जाणाऱ्या एका दाम्पत्यावर केमिकल पडल्याने तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

रविवारी रात्री कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात राहणाऱ्या साळसकर दाम्पत्य शॉपिंग करून घरी जात असताना हा प्रक घडला पत्नी गौरी साळसकर वर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तिच्या चेहऱ्यावर, हातावर आणि पायावर केमिकल पडल्याने ती भाजली आहे. तर पती गौरेश यांच्या डोळ्यात केमिकल गेल्याने एका डोळ्याने त्यांना दिसत नसल्याने त्यांना मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दीड वर्षाचा मुलगा तनिष किरकोळ जखमी आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी अज्ञात टँकर चालका विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*