Site icon LNN

‘कॅन्सरमुक्त कल्याण’ संकल्पनेला बळ ; आयसीटीसी फाऊंडेशनतर्फे येत्या २ ऑगस्ट रोजी ‘कल्याण मान्सून रन २०२६’चे आयोजन

कल्याण | १४ जुलै :
कॅन्सरविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘कॅन्सरमुक्त कल्याण’ संकल्पनेवर इंडियन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर अर्थात आयसीटीसी फाउंडेशनतर्फे ‘कल्याण मान्सून रन २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सहकार्याने होणारी ही स्पर्धा रविवार, २ ऑगस्ट २०२६ रोजी कल्याण पश्चिमेतील रिंग रोड येथे पार पडणार आहे. (‘Cancer-Free Kalyan’ Initiative Gains Momentum; ICTC Foundation to Organise ‘Kalyan Monsoon Run 2026’ on August 2)

सध्या “कॅन्सर वाढत असला तरी आजच्या घडीला आधुनिक आणि प्रभावी उपचार उपलब्ध झाले आहेत. मात्र उपचार घेण्यासाठी रुग्णांकडून लागणारा विलंब टाळण्यासाठी जनजागृती ही सगळ्यात महत्त्वाची पहिली पायरी असल्याचे परखड मत आयसीटीसीचे प्रमूख कॅन्सरतज्ज्ञ डॉ. अमित घाणेकर यांनी दिली. विशेष म्हणजे रुग्णांना मुंबईला जाण्या येण्यासाठी लागणारा खर्च, होणारा मानसिक – शारीरिक त्रास, वेळ आणि लागणारे मनुष्यबळ पाहता आता आयसीटीसी कल्याणमुळे हा सर्व त्रास वाचणार आहे. कॅन्सरवरील सर्व आधुनिक उपचार आता टीम आयसीटीसीच्या किमो थेरपी डे केअर चेनमुळे एमएमआर रिजनसह कल्याणातही उपलब्ध झाल्याची माहिती कॅन्सर स्पेशालिस्ट डॉ. अमित घाणेकर यांनी दिली.

अशी असेल मॅरेथॉन…
या मॅरेथॉनमध्ये ३ कि.मी., ५ कि.मी. आणि १० कि.मी. अशा तीन गटांमध्ये धावण्याची संधी उपलब्ध असून, सर्व वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयसीटीसी कल्याणचे प्रमूख ऑन्कोलॉजिस्ट डॉ. अमित घाणेकर यांनी केले आहे. ५ कि.मी. आणि १० कि.मी. गटातील विजेत्यांसाठी रोख पारितोषिके ठेवण्यात आली असून, स्पर्धेसाठी नोंदणी ऑनलाइन तसेच दिलेल्या संपर्क क्रमांकावरून करता येणार आहे.

सहभागी होण्यासाठी धावपटूंनी ९१७०२१७९५६०८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Exit mobile version