Home ठळक बातम्या कचरा प्रकल्प रद्द न केल्यास निवडणुकांवर बहिष्काराचा स्थानिकांचा इशारा

कचरा प्रकल्प रद्द न केल्यास निवडणुकांवर बहिष्काराचा स्थानिकांचा इशारा

कल्याण दि.4 फेब्रुवारी :
बारावे येथील ‘एसएलएफ’ कचरा प्रकल्प (शास्त्रोक्त भराव पद्धत) कल्याण डोंबिवली महापालिकेने रद्द न केल्यास येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे. तसेच या प्रश्नासाठी उद्या स्थानिक रहिवासी महापालिकेवर निषेध मोर्चा काढणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

महापालिकेने याठिकाणी कचरा क्षेपणभूमीचे आरक्षण टाकले त्यावेळी हा संपूर्ण परिसर मोकळा होता. मात्र याच महापालिका प्रशासनाने पुढच्या काळात या आरक्षित जागेच्या परिसरात गृहसंकूलांना कोणत्या आधारावर परवानगी दिली? असा प्रश्न उपस्थित करत शासनाच्या अटी आणि शर्तींचा महापालिका या प्रकल्पाद्वारे भंग करीत असल्याचा आरोपही यावेळी स्थानिकांनी केला. गेल्या 2 वर्षापासून आम्ही या प्रकल्पाला विरोध करत असून पालिका प्रशासनाने आतापर्यंत आमची दिशाभूल केल्याचेही या रहिवाशांचे म्हणणे आहे.

त्यामुळे उद्या महापालिका मुख्याल्यावर आम्ही भव्य निषेध मोर्चा काढून पालिकेला हा प्रकल्प रद्द करण्यास भाग पाडू. तसेच येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा इशाराही यावेळी स्थानिकांनी दिला आहे.  त्यावर आता महापालिका नेमकी कोणती भूमिका घेते हे लवकरच स्पष्ट होईल.

यावेळी तुषार बंडोपाध्याय, भारत मिरकुटे, सुनील घेगडे, सचिन शेट्टी, अरुण नायर, राहुल सूर्यवंशी आदी स्थानिक रहिवाशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

1 COMMENT

  1. It is a very important issue and needs to be taken it up by everybody seriously till the time the reservation is cancelled by the concerned authority.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*