Home ठळक बातम्या खबरदार : कल्याणात ट्रॅफिक सिग्नल मोडाल तर आता होणार कायदेशीर कारवाई

खबरदार : कल्याणात ट्रॅफिक सिग्नल मोडाल तर आता होणार कायदेशीर कारवाई

 

कल्याण दि.16 जानेवारी :
गेल्या काही महिन्यांपासून कल्याणात प्रायोगिक तत्वावर सुरू असणारी सिग्नल यंत्रणा आता अधिकृतपणे कार्यान्वित करण्याचा निर्णय कल्याण डोंबिवली महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. येत्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असून आता तुम्ही सिग्नल मोडला तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. कल्याण पूर्व आणि पश्चिमेतील 8 प्रमूख रहदारीच्या चौकातील सिग्नल यंत्रणा अधिकृतपणे सुरू केली जाणार आहे.

स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, (SKDCL)केडीएमसीच्या स्मार्ट आणि सेफ सिटी एलिमेंन्ट या प्रकल्पांतर्गत ही सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून याठिकाणी प्रायोगिक तत्वावर ही सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होती. विशेष म्हणजे सुमारे 95 टक्के नागरिक त्याचे पालन करीत होते. तर 5 टक्के काही अतिशहाणे महाभाग मात्र सर्रासपणे त्याचे उल्लंघन करत असल्याचे दिसून आले. या अशा अतिशहाण्या वाहन चालकांवर 26 जानेवारीपासून कारवाई केली जाणार आहे. सिग्नल यंत्रणेतील स्वयंचलित कॅमे-याने संबंधित वाहनाच्या नंबरप्लेटचा फोटो काढला जाऊन ज्या व्यकतीच्या नावावर ते वाहन रजिस्टर असेल त्याला ई-चलनाचा म्हणजेच दंडाचा संदेश प्राप्त होणार आहे. त्यामूळे आता 26 जानेवारीपासून सिग्नल मोडणार असाल तर 10 वेळा विचार करा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा.

सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर या सर्व वर्दळीच्या ठिकाणी वाहतूकीची कोंडी सुटण्यास मदत होईल. तरी सिग्नल यंत्रणा चालू झाल्यानंतर ई चलन लागु नये म्हणून वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

याठिकाणी सुरू होणार सिग्नल यंत्रणा…
1 आधारवाडी जंक्शन
2 खडकपाडा चौक
3 संदीप हॉटेल जंक्शन,
4. प्रेम ऑटो,
5.चक्की नाका,
6. सुभाष चौक,
7. विठ्ठलवाडी तलाव,
8.काटेमानेवली जंक्शन

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा