Site icon LNN

महत्त्वाची माहिती : डोंबिवलीचा पाणीपुरवठा यादिवशी राहणार 9 तास बंद

डोंबिवली दि.20 फेब्रुवारी :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. डोंबिवलीतील मोहिली उदंचन केंद्र आणि नेतीवली जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत – यांत्रिक दुरुस्तीच्या कामांमुळे डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागातील पाणीपुरवठा 9 तास बंद राहणार आहे. (Important Notice: Dombivli Water Supply to Remain Shut for 9 Hours on This Day)

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार,
📅 मंगळवार, दि. 24 फेब्रुवारी 2026 रोजी
⏰ सकाळी 9.00 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत या कालावधीत (एकूण 9 तास) नेतीवली जलशुद्धीकरण केंद्रातून डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

ही कामे पाणीपुरवठा यंत्रणेची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आवश्यक असल्याचे सांगत नागरिकांनी आधीच पुरेसा पाणीसाठा करून महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Exit mobile version