Home ठळक बातम्या महापालिका निवडणूकीसंदर्भात राज्य निवडणुक आयोगाचे महत्त्वाचे आदेश

महापालिका निवडणूकीसंदर्भात राज्य निवडणुक आयोगाचे महत्त्वाचे आदेश

मुदत संपलेल्या राज्यातील महापालिकांना पाठवले पत्र

मुंबई दि.१० मे :
सर्वोच्च न्यायालयाने येत्या २ आठवड्यात निवडणूक जाहीर करण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगानेही त्यादृष्टीने आता कंबर कसलेली दिसत आहे. त्यामुळेच मुदत संपलेल्या राज्यातील महानगरपालिकाना राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक प्रक्रियेबाबत पत्र पाठवण्यात आले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, अमरावती, नवी मुंबई वसई विरार उल्हासनगर कोल्हापूर अकोला सोलापूर नाशिक , पिपंरी चिंचवड, कल्याण डोंबिवली महापालिकांना आयोगाने पत्र लिहिले आहे.

महापालिका निवडणूक संदर्भात राज्य निवडणुक आयोगाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, ११ मेपर्यंत अंतिम प्रभाग रचना काम पूर्ण करण्यात येणार असून १२ मे पर्यंत प्रभाग रचनेचा अंतिम प्रस्ताव राज्य निवडणुक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठवावा लागणार आहे. १७ मे पर्यंत प्रभाग रचना अंतिम प्रसिद्ध करावी लागणार आहे. त्यानंतर, १७ मे रोजी अंतिम प्रभाग रचना यादी शासन राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे निर्देशही राज्य निवडणुक आयोगाने दिले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा