Site icon LNN

महत्त्वाची माहिती; निळजे रेल्वे ब्रिजच्या कामासाठी कल्याण-शिळ मार्गावर मोठे वाहतूक बदल

कल्याण दि.1 एप्रिल :
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या कामांतर्गत कल्याण – शिळफाटा मार्गावरील जुना निळजे रेल्वे उड्डाणपूल (कल्याणहून शिळफाट्याकडे जाणाऱ्या मार्गावर) तोडून नवा बांधण्याचे काम सुरू आहे. आजपासून म्हणजेच 1 एप्रिलच्या रात्री 12 वाजल्यापासून ते 31 मे 2026 पर्यंत हे काम केले जाणार असल्याने या मार्गावर पुढीलप्रमाणे मोठे वाहतूक बदल करण्यात आले आहेत.

यासंदर्भात वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त पंकज शिरसाट यांनी अधिसूचना काढून ही माहिती दिली आहे. तसेच आजपासून 31 मे 2026 पर्यंत ही अधिसूचना लागू राहणार असल्याचे त्यांनी यामध्ये नमूद केले आहे.

Exit mobile version