Home ठळक बातम्या शहाड येथील विठ्ठल मंदिरात कपिल पाटील यांच्या हस्ते महापुजा; हजारो भक्तांची दर्शनासाठी...

शहाड येथील विठ्ठल मंदिरात कपिल पाटील यांच्या हस्ते महापुजा; हजारो भक्तांची दर्शनासाठी गर्दी

कल्याण, दि. १० जुलै :

शहाड येथील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरात केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते आज महापुजा करण्यात आली. त्यानंतर हजारो भाविकांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. आषाढी एकादशीनिमित्ताने आज शहाड परिसरात विठ्ठल भक्तीचा गजर होत होता.

बिर्ला कंपनीने शहाड येथे उभारलेल्या श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराची प्रतिपंढरपूर म्हणून वारकऱ्यांकडून पसंती दिली जाते. पंढरपूरच्या यात्रेला न जाता आलेले हजारो भाविक शहाड येथील मंदिरात विठ्ठलाचे दर्शन घेतात. या मंदिराचे व्यवस्थापन बिर्ला समुहाच्या वतीने केले जात आहे. आषाढी एकादशीनिमित्ताने आज श्री विठ्ठलाची महापुजा करण्यात आली. यंदा हा मान केंद्रीय केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांना देण्यात आला. या वेळी सेंच्युरी रेयॉन समुहातील मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश चितलांगे यांचीही उपस्थिती होती.

देशातील सर्व जनतेला निरोगी व सुखी-समाधानी आयुष्य लाभो. पुरेसा पाऊस पडून देशातील बळीराजा सुखी होवो, यासाठी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी विठ्ठलाला साकडं घातले. तिसरी-चौथीत असताना वडिलांबरोबर रांगेत उभे राहून दर्शन घेतले होते. आज माझ्या हस्ते श्री विठ्ठलाची महापुजा झाल्यामुळे मी आज भाग्यवान आहे, अशी भावना केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केली. दरम्यान यावेळी त्यांच्या श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा