Home कोरोना इंडियन मेडिकल असोसिएशन डोंबिवलीतर्फे ‘लाइफ सेव्हर्स रन – व्हर्च्युअल ग्लोबल मॅराथॉन’चे आयोजन

इंडियन मेडिकल असोसिएशन डोंबिवलीतर्फे ‘लाइफ सेव्हर्स रन – व्हर्च्युअल ग्लोबल मॅराथॉन’चे आयोजन

 

डोंबिवली दि.22 जानेवारी :
इंडियन मेडिकल असोसिएशन डोंबिवलीतर्फे येत्या ७ फेब्रुवारी रोजी ‘व्हर्च्युअल ग्लोबल मॅराथॉन – ‘लाइफ सेव्हर्स रन’चे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाशी लढताना शहीद झालेल्या देशभरातील डॉक्टरांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी याद्वारे निधी गोळा करण्यात येणार आहे.
कोरोना आल्यापासून त्याच्याशी लढताना देशभरात आतापर्यंत ७३६ डाॅक्टर्स कोरोना रूग्णांवर उपचार करतांना शहीद झाले आहेत. त्यांना मानवंदना देण्यासाठी आयोजित या उपक्रमाला ‘इंडियन मेडिकल असोसिएशन मुख्यालय (IMA Headquarters) आणि वर्ल्ड मेडिकल असोसिएशन (WMA)ने पाठिंबा दिला आहे. या मॅरेथॉनच्या माध्यमातून जमा झालेला निधी आयएमए मुख्यालयाच्या कोवीड मार्टियर फंड (COVID MARTYR FUND) मध्ये जमा केला जाणार आहे. ज्याद्वारे या कोविड हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचे डोंबिवली आयएमएतर्फे सांगण्यात आले. या मॅरेथॉनमध्ये वैद्यकीय व्यावसायिक किंवा नॉन मेडिको, मॅरेथॉनर, हौशी धावपटू किंवा कोणीही सहभागी होऊ शकतात. ही एक व्हर्च्युअल मॅरेथॉन असून त्यात सामील होण्यासाठी कोठेही एकत्र जमण्याची आवश्यकता नाही. www.lifesaversrun.org या लिंकवर नोंदणी केल्यानंतर, जिथे तुम्हाला चालायचे असेल तेथे चाला किंवा धावायचे असेल तिकडे धावल्यानंतर स्मार्टफोन अ‍ॅपद्वारे www.lifesaversrun.org या वेबसाईटवर तपशील पाठवण्याचे आवाहनही डोंबिवली आयएमएतर्फे करण्यात आले आहे.
या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी 93563 28972 या क्रमांकावर किंवा www.lifesaversrun.org या वेबसाईटवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा