Home कोरोना कल्याण डोंबिवलीतील उद्याच्या लसीकरणाची माहिती; 30 वर्षांवरील नागरिकांसाठी विशेष सुविधा

कल्याण डोंबिवलीतील उद्याच्या लसीकरणाची माहिती; 30 वर्षांवरील नागरिकांसाठी विशेष सुविधा

 

कल्याण -डोंबिवली दि.18 जून :
राज्य शासनाने व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये दिलेल्या सूचनांनुसार कल्याण डोंबिवलीत उद्या 30 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कल्याणातील आचार्य अत्रे रंगमंदिर आणि डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह या दोन ठिकाणी 30 वर्षांवरील नागरिकांना लस दिली जाणार आहे.

या दोन्ही ठिकाणी 200 जणांना ऑनलाईन स्लॉट बुक करून आणि 300 जणांचे ऑफलाइन पद्धतीने लसीकरण केले जाणार असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे. ऑनलाइन स्लॉट बुकींगसाठी आज रात्री 10 वाजता स्लॉट खुले होणार असल्याचेही केडीएमसीने स्पष्ट केले आहे.

 

याठिकाणी मिळणार कोव्हॅक्सीनचा केवळ 2 रा डोस…

प्रबोधनकार ठाकरे शाळा लसीकरण केंद्र कल्याण (पूर्व) महानगरपालिकेच्या नेतीवली दवाखान्याच्या बाजूला आणि वै. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल कोविड लसीकरण केंद्र डोंबिवली (पूर्व) याठिकाणी “कोव्हॅक्सीन लसीचा केवळ 2 रा डोस” दिला जाणार आहे. या दोन्ही ठिकाणी हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण होणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून लस साठा उपलब्ध असेपर्यंत ही केंद्र सुरू राहणार आहेत.

ही केंद्र वगळता उर्वरित केंद्रांवर हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 45 वर्षावरील नागरिकांचे सकाळी 10 वाजल्यापासून लससाठा उपलब्ध असेपर्यंत लसीकरण केले जाणार आहे. याठिकाणी कोवीशिल्ड लसीचा 1 ला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा