Home ठळक बातम्या उपलब्ध तंत्रज्ञानाचा भारतीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज – अणूशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर

उपलब्ध तंत्रज्ञानाचा भारतीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज – अणूशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर

 

डोंबिवली दि.5 जानेवारी :
देशात उपलब्ध तंत्रज्ञानाचा भारतीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी उपयोग याबाबतीत मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्याची गरज आंतरराष्ट्रीय किर्तीप्राप्त अणूशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केली आहे. डोंबिवलीत झालेल्या विज्ञान संमलेनात ते बोलत होते.

भारताच्या गरज खूप मोठ्या आहेत. त्या पूर्ण करायच्या झाल्या तर जे करतोय ते कमी आहे. मोठ्या प्रमाणात वीज निर्माण व्हायला हवी, मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा निर्माण व्हायला पाहिजेत. कॅन्सर उपचारामध्ये अणुऊर्जेच्या योगदान खूप मोठे आहे. तसे शेतीक्षेत्रामध्येही अणुऊर्जेच्या माध्यमातून बदल घडवण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. तर तंत्रज्ञानात दिवसागणिक बदल होतोय. नविन तंत्रज्ञान आल्यावर अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला उपयोग करता येऊ शकतो असे मतही डॉ.काकोडकर यांनी यावेळी व्यक्त केले.

तर सध्याच्या शासन काळात पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांपेक्षा अणुऊर्जेला कमी महत्व दिलं जात आहे का? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की अणुऊर्जा ही खूप मोठी प्रक्रिया असून आधी जे विरोधात असतात ते सत्तेमध्ये आल्यानंतर पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांप्रमाणे वागतात असे त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान विविध शाळेतील मुलांनी तयार केलेले कल्पक व नाविन्यपूर्ण वैज्ञानिक प्रकल्पाचे प्रदर्शन भरवण्यात आले त्याचप्रमाणे व्याखाने आणि चर्चासत्राचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. सकाळी डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध वैज्ञानिक प्रकल्प पाहून डॉ. काकोडकर यांनी त्यांचं कौतुक केलं.

या विज्ञान संमेलनाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, केडीएमसी महापौर विनिता राणे,सभापती दिपेश म्हात्रे, सभागृह नेते श्रेयस समेळ, दा.कृ.सोमण, डॉ.उल्हास कोल्हटकर उपस्थित होते. या संमेलनाचे आयोजन मराठी विज्ञान परिषद,जनरल एज्युकेशन इन्स्टीट्यूट आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका तर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*