Home क्राइम वॉच कल्याणजवळील इराणी वस्तीत आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवर इराण्यांचा हल्ला

कल्याणजवळील इराणी वस्तीत आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवर इराण्यांचा हल्ला

 

कल्याण दि.4 फेब्रुवारी :
कल्याणजवळील इराणी वस्ती पोलिसांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे. एका सराईत आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवर इराण्यांनी तुफान दगडफेककेल्याचा प्रकार समोर आला आहे.

आंबविलीच्या इराणी वस्तीमध्ये एक सराईत गुन्हेगार पडकण्यासाठी हे पोलिसांचे पथक आले होते. मात्र ते नेमक्या पोलीस ठाण्याचे होते याबाबत सविस्तर माहिती मिळू शकली नाही. या पथकाने संबंधित व्यक्तीला पकडले आणि गाडीत बसवून नेत होते. नेमक्या त्याच वेळेला रेल्वे फाटक बंद झाल्याने पोलिसांच्या दोन्ही गाड्या तिकडे अडकून पडल्या. आणि हीच संधी साधत इराणी वस्तीतील महिला आणि तरुणांनी पोलिसांच्या गाड्यांवर तुफान दगडफेक सुरू केली. तर काही जणांनी बांबूच्या सहाय्याने गाड्यांवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्याने पोलिसही बिथरून गेले. दोन गाड्यांपैकी एक गाडी कशीबशी तिथून दुसऱ्या मार्गाने निघून गेल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र हे पोलीस नेमके कोणत्या पोलीस ठाण्याचे होते आणि या हल्ल्यात त्यांना काही दुखापत झाली का याबाबत मात्र कोणतीच माहिती मिळू शकलेली नाही.

दरम्यान कल्याणच्या आंबविलीजवळील इराणी वस्ती आणि तिथली गुन्हेगारी पार्श्वभूमी काही नविन नाही. याआधीही इकडे पोलिसांवर हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यात आणखी एका घटनेची भर पडली असून इराणी वस्तीतील लोकांची ही दहशत पोलीस विभाग आणखी किती काळ सहन करणार? या दहशतीला आणि थेट खाकी वर्दीवर हात टाकणाऱ्यांना सरकार आणखी किती पाठीशी घालणार हाच खरा प्रश्न आहे. आतापर्यंत अनेक सरकारे बदलूनही या प्रश्नाचे उत्तर काही सापडलेले नाही.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा